Advertisement

बोरखेडजवळ जबरी दरोडा

प्रजापत्र | Thursday, 04/08/2022
बातमी शेअर करा

बीड तालुक्यातील बोरखेड जवळ असलेल्या वडवाडी येथे काल मध्यरात्री अज्ञात 8 ते 10 दरोडेखोरांनी बळीराजा कृषि विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांच्या कार्यालय आणि घरी धाडसी दरोडा टाकून पती-पत्नीला मारहाण करत 9 लाख रुपये रोख आणि 5 तोळे सोने चोरून नेले. या घटनेने बालाघाटावर खळबळ उडाली असून घटनेची माहिती देताच नेकनूर व एलसीबी च्या अधिकारी, पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.
    या धाडसी दरोड्यानंतर जिल्हा पोलीस दलाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत श्वानासह घटनास्थळी भेट देऊन चोरीच्या ठिकाणावरून श्वानाने माग काढला आहे.दरम्यान, या संस्था परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरटे कैद झाले असून प्रकारणाचा तपास लावण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलासमोर आहे.

Advertisement

Advertisement