Advertisement

माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे निधन.

प्रजापत्र | Monday, 01/08/2022
बातमी शेअर करा

देवगिरी तरुण भारतचे माजी संपादक, ज्येष्ठ विचारवंत, उत्तम वक्ते, स्तंभ लेखक अशी त्यांची ओळख होती. राज्याचे माहिती आयुक्त म्हणून दिलीप धारूरकर यांनी काम पाहिले आहे. काही दिवसांपुर्वी त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्याने औरंगाबाद (Aurangabad) येथील हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दि.1 अॉगस्ट रोजी उपचार सुरु असताना दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांचा तरुण भारत मधील ‘ प्रहार ‘ हा स्तंभ प्रचंड लोकप्रिय होता.

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) जेष्ठ स्वयंसेवक, दीर्घकाळ तरूण भारत (Tarun Bharat) वृत्तपत्राचे संपादक, 5 वर्ष माहिती आयुक्त (Information Commissioner) म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीचा ठसा उमटवला आहे. दिलिप धारूरकर यांनी आपल्या 60 वर्षांच्या आयुष्यात असंख्य लोकांशी जीवाभावाची मित्रता जपली होती. त्रिपुरा विश्वविद्यालयाचे कुलगुरु वि.ल. धारुरकर यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावार दुपारी 5 वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement

Advertisement