नाशिक : आयात केलेला परदेशी कांदा मुंबईत दाखल होत आहे तसेच नवीन लाल कांद्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सर्वसाधारण बाजारभावात प्रतिक्विंटल मागे 1200 रुपयांची तर कमाल बाजारभावात 891 रुपयांची घसरण झाली आहे. अचानक एका दिवसात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. परदेशी कांदा मुंबईत आला आहे, तसेच देशांतर्गत बाजार समित्यांमध्येदेखील लाल कांद्याची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे.
बातमी शेअर करा