Advertisement

कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई

प्रजापत्र | Saturday, 30/07/2022
बातमी शेअर करा

परळी (प्रतिनिधी)- सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांना  गुप्त बातमीदारामार्फत बेकायदेशीररित्या अंबाजोगाई परळी रोडच्या उत्तर बाजूस भोपळा शिवारात एका हॉटेलच्या शेजारील शेतात पत्र्याच्या बंद रूममध्ये काही व्यक्ती एकत्र बसून, लाईटच्या उजेडामध्ये लोकांकडून पैसे घेऊन जन्नामन्ना जुगाराचा खेळ खेळत होते . कार्यालयातील पोलीस स्टेशन केज येथील अंमलदार यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई केली.

 

 

   या पथकातील कारवाई पोह बांगर, दराडे, गीते भंडाणे मंदी, पोशि बहिरवाळ तुले असे कर्मचारी खाजगी वाहनाने सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासोबत पोना वंजारी, अंगरक्षक पोशि जावले व दोन पंच घेऊन, रात्री हॉटेल सातबाराच्या पाठीमागे पत्र्याच्या रुममध्ये जाऊन रात्री बाराच्या दरम्यान छापा मारला. सदर ठिकाणी पत्र्याच्या बंद शेडमध्ये काही इसम जन्नामन्ना नावाचा ,अंदर- बाहर जुगार खेळताना मिळून आले. सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचे झाडाझडती घेतले असता नगदी रुपये , मोबाईल, जुगार साहित्य मिळून आले. तसेच गाड्यांच्या किमतीसह नगदी रक्कम रुपये ३८६००० मिळाले. सदरील कारवाईत हॉटेलचे चालक- मालक, वेटर ,कुक व बघे यांना आरोपी बनवण्यात आले आहे. ही कारवाई करत असताना अंबाजोगाई - परळी रोडवर बघायची मोठी गर्दी होती. एकूणच हॉटेलमधील ग्राहक व कामगारांना आरोपी करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन परळी येथे गुन्हा नोंदवण्यात आला. सदरची कामगिरी सहा. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
   वरील सर्व एकूण २८आरोपी विरुद्ध कलम महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे ४,५ गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि मारोती मुंडे करीत आहेत.

 

Advertisement

Advertisement