बीडः महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग पदविधर मतदार संघाची निवडणूक जाहिर झाली आहे. या मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची मुदत १९ जुलै रोजी संपली आहे. मात्र कोरोना परिस्थितीमुळे या मतदारसंघातील निवडणूक लांबली होती. आता या मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहिर केला आहे. त्यानुसार आता पदविधर मतदारसंघासाठी ५नोव्हेंबर पासुन अर्ज दाखल करता येणार आहेत. १२ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार असून १७ नोव्हेंबर रोजी माघार घेता येईल. तर १ डीसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हेच उमेदवार असतील तर भाजप जयसिंग गायकवाड यांना निवडणुकिच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे.
बातमी शेअर करा