Advertisement

नदीच्या पाण्यात पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

प्रजापत्र | Monday, 25/07/2022
बातमी शेअर करा

माजलगाव -सिंदफना नदीच्या पाण्यात पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना जुना माजलगाव शहरातील सिद्धेश्वर मंदिरालगत सोमवार दिनांक 25 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

 

वलिद नासेर (अल्सारी)चाऊस वय 15 वर्षे राहणार पाटील गल्ली.हा मुलगा सकाळी साडेदहा वाजता जुन्या शहरातील सिद्धेश्वर मंदिरा जवळून वाहणाऱ्या सिंधफणा नदी पात्रात पडल्याची माहिती परिसरात पसरली होती.त्यानंतर परिसरातील तरुणांनी नदीपात्रात त्याची शोध मोहीम राबवली.बारा वाजण्याच्या दरम्यान त्याचे मृत अवस्थेतील शरीर सापडले.दरम्यान शवविच्छेदनासाठी बॉडी जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आली आहे.मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement

Advertisement