Advertisement

पदावरुन निवृत्त झाल्यानंतर माजी राष्ट्रपती देशाचे कितवे नागरिक असतात?

प्रजापत्र | Saturday, 23/07/2022
बातमी शेअर करा

भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील त्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. 25 जुलै रोजी द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) निवृत्त होणार असून ते सरकारी बंगल्यात स्थायिक होतील. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक (First Citizen of India) असतात. मात्र राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर देशाचे माजी कितव्या क्रमांकाचे नागरिक असतात, हे तुम्हाला माहीत आहे का? सरकारी प्रोटोकॉलनुसार, देशात 26 प्रकारचे नागरिक असतात. ते सर्व खास पदांवरील व्यक्ती असतात. देशातील कोणत्या महत्वाच्या पदांवरील व्यक्ती देशातील कितव्या क्रमांकाचे नागरिक आहे, याची एक यादीच गृह मंत्रालायात आहे. देशाचे राष्ट्रपती हे देशातील प्रथम नागरिक असतात. मात्र ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर परिस्थिती वेगळी असते.

 

 

देशातील सर्वसामान्य नागरिक म्हणजेच जनता हे 27 व्या क्रमाकांवर असतात. त्यांच्या वरच्या पदावर उच्च पदावरील अथवा निवृत्त व्यक्तींचा समावेश होतो. त्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापासून राज्यपालांचा समावेश असतो. प्रोटोकॉलनुसार, निवृत्त झाल्यानंतर माजी राष्ट्रपती हे देशाचे 5 व्या क्रमांकाचे नागरिक ठरतात.

 

 

कोण आहेत देशाचे 26 नागरिक ?

  • नागरिक (01) – राष्ट्रपती, ज्या आता द्रौपदी मुर्मू असतील.द्वितीय नागरिक (02) – उपराष्ट्रपती
  • तृतीय नागरिक (03)- पंतप्रधान, नरेंद्र मोदी हे या स्थानावर आहेत.
  • चौथे नागरिक (04)- (संबंधित राज्यांचे) राज्यपाल
  • पाचवे नागरिक (05) – देशाचे माजी राष्ट्रपती. ( सध्या या स्थानावर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आहे. रामनाथ कोविंद निवृत्त झाल्यानंतर ते 5व्या क्रमांकाचे नागरिक बनतील.)
  • पाचवे नागरिक (A) (05A) – देशाचे उप पंतप्रधान
  • सहावे नागरिक (06) – भारताचे मुख्य न्यायाधीश आणि लोकसभा अध्यक्ष
  • सातवे नागरिक (07)- केंद्रीय कॅबिनेट मंत्री, (संबंधित राज्यांचे) मुख्यमंत्री, नीति आयोग उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते.
  • सातवे नागरिक (A) (07A) – भारत रत्न पुरस्कार विजेते
  • आठवे नागरिक (08) – भारताचे मान्यता प्राप्त राजदूत
  • नववा नागरिक (09) – सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश
  • नववा नागरिक (09) (A) – युनिअन पब्लिक सर्व्हीस कमिशन (UPSC) चे अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
  • 10 वे नागरिक – राज्यसभा उपाध्यक्ष, उप मुख्यमंत्री, लोकसभेतील उपसभापती, नीति आयोगाचे सदस्य, राज्यमंत्री
  • 11 वे नागरिक – ॲटर्नी जनरल, कॅबिनेट सचिव, उप राज्यपाल
  • 12 वे नागरिक – रॅंक ऑफिसर्सचे प्रमुख किंवा पूर्व जनरल
  • 13 वे नागरिक – राजदूत
  • 14 वे नागरिक – विधानसभा स्पीकर, उच्च न्यायलयाचे चीफ जस्टिस
  • 15 वे नागरिक – राज्यातील कॅबिनेट मंत्री, केंद्रशासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी काउन्सिलर
  • 16 वे नागरिक – लेफ्टनंट जनरल
  • 17 वे नागरिक – अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जातीचे राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष
  • 18 वे नागरिक – राज्य विधान मंडळाचे सभापती व अध्यक्ष, केंद्रशासित प्रदेशातील मंत्री
  • 19 वे नागरिक – संघ शासित प्रदेशांचे मुख्य आयुक्त
  • 20 वे नागरिक – राज्य विधानसभाचे अध्यक्ष व उपाध्यश्र
  • 21 वे नागरिक – खासदार
  • 22 वे नागरिक – राज्यातील उपमंत्री23 वे नागरिक – आर्मी कमांडर, राज्य सरकारचे मुख्य सचिव
  • 24 वे नागरिक – उप राज्यपाल रँकचे अधिकारी
  • 25 वे नागरिक – भारत सरकारचे अतिरिक्त सचिव
  • 26 वे नागरिक – भारत सरकारचे संयुक्त सचिव
  • 27 वे नागरिक – सर्वसामान्य जनता

Advertisement

Advertisement