मुंबई : आज पासून राज्यातील राष्ट्रीय बँकेच्या वेळेत बदल झाला असून आज पासून बँकेची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत सुरु राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकांना हा नियम लागू असणार आहे. या बाबत काही दिवसांपूवीच अर्थ मंत्रालयानं सूचना दिल्या होत्या. तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यांवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. ०. २५% च्या कपाती नंतर आता व्याजदर हे ३. २५% असणार आहे. तर बँक ऑफ बडोदा आता पैसे काढण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी सुद्धा शुल्क आकारणार आहे. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यावर ग्राहकांना शुल्क भरावे लागणार आहे. लोन खात्यासाठी ३ पेक्षा जास्त वेळा रक्कम काढल्यास १५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर बचत खात्यामध्ये ग्राहकांना केवळ ३ वेळाच पैसे जमा करता येणार आहेत. चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना ४० रुपये मोजावे लागणार आहेत.
बातमी शेअर करा