Advertisement

धारुर घाटात दोन वाहनांचा अपघात

प्रजापत्र | Tuesday, 19/07/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.19 जुलै – धारुर घाटात दोन वाहनांचा अपघात झाला असून चौदा चाकी ट्रक रस्त्यावर आडवा झाला आहे. सदर अपघात सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झालेली नाही.

 

 

गेल्याच आठवड्यात 100 वारकऱ्यांना घेवून जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना ताजी असताना धारुर घाटात पुन्हा दोन वाहनं अपघातात क्षतीग्रस्त झाली आहेत. साखर घेवून जाणाऱ्या टेम्पो कठड्याला धडकल्यामुळे रस्त्यावर थांबला होता. याच वळणावर अपघातग्रस्त टेम्पोजवळ 14 चाकी सरकी घेवून जाणाऱ्या ट्रकचा (ट्रक क्र. एमएच 38 एक्स 2777) अपघात (Accident) झाला. या अपघातात ट्रक पलटी झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसुन दोघे जण किरकोळ जखमी झाले असल्याचे कळते.

 

 

गेल्या आठवड्यातच वाचले 100 वारकरी.
दि.13 बुधवारी पंढरपूरहुन परभणी जिल्ह्यातील पोखर्णीकडे 100 वारकरी घेऊन ट्रक ( क्र एम एच 11 एम 4019) जात होता. रात्री नऊच्या सुमारास धारुर घाटात आले असता या ट्रकचे ब्रेक फेल झाले. मात्र चालकाने हुशारी दाखवत अवघड घाटातील संरक्षक कठड्याला घासून कसाबसा ट्रक खोल दरीत पडण्यापासून वाचवला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला होता. घटनेची माहिती धारूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांना मिळताच तात्काळ मदतकार्य करण्यात आले होते.

 

 

राष्ट्रीय महामार्ग 548 सी (National Haighway 548 C) या रस्त्यावरील धारुर घाट (Dharur Ghat) अरुंद असल्यामुळे नेहमीच अपघात होण्याचे प्रमाण घडत आहेत. वाढते अपघात (Accident) पाहता घाट सरळीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी सातत्याने होत आहे. अनेक जणांचा बळी जावूनही प्रशासनाकडून याप्रकरणी डोळेझाक होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

( Two vehicle accident in Dharur Ghat; The chain of accidents continues. )
 

Advertisement

Advertisement