नागपूर: मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. आेबीसींसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे. अशा वेळी ओबीसी मुलांनी बेरोजगार म्हणून फिरायचे काय, असा सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केला. ओबीसींसह इतर समाजातील मुलांना कदापि वेठीस धरायला नको. मराठा समाजावर अन्याय व्हायलाच नको, पण असे करताना ओबीसींवरही अन्याय नको, असे ते म्हणाले.
नोकरभरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे. कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशा भावनाही वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या. यासंदर्भात अडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेऊ. मोठ्या समाजाने लहान समाजाला किती दाबत ठेवायचे, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.राज्य सरकारने मराठा समाजाला नोकऱ्यांत १२ % आरक्षण दिले. याला कुणी कोर्टात आव्हान देत असेल तर न्यायालयीन प्रक्रियेला किती वेळ लागेल, हे कुणाच्या हातात नाही. तोपर्यंत मराठा समाजाच्या जागा न भरता इतर समाजाच्या जागा भरणे योग्य राहील, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.
प्रजापत्र | Saturday, 31/10/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा