बीड दि.12 जुलै – बीड जिल्ह्यात वाटमारी करण्याचा प्रकार अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडला आहे. कडा येथील एका दुकानात काम करणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला रस्त्यावर अडवून त्याच्याकडील 3 लाख 11 हजारांची रोकड घेऊन दोघांनी चारचाकीतून पळ काढला.
दुकानातुन दिलेल्या मालाच्या उधारीचे पैसे घेण्यासाठी अंमळनेर, पांढरवाडीफाटा, खिळद वरून धामणगांव मार्ग कड्याला जात असलेल्या तरुणावर पाळत ठेवून मारुती स्विफ्ट कार (Maruti Swift car) मध्ये पाठलाग करत असलेल्या दोघा जणांनी त्रिमुर्ती पेट्रोलपंपाच्या (Petrol Pump) जवळ दुचाकीवरील तरूणाला अडवले. चाकुचा धाक दाखवून त्याच्याकडील 3 लाख 11 हजारांची रोकड घेऊन पाबोरा केल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील धामणगांव येथे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
अशी घडली घटना…
आष्टी तालुक्यातील आदेश गौतम बोखारे (वय वर्ष 23) रा. चोभानिमगांव हा तरूण कडा येथील पटवा सप्लायर्स या दुकानात कामाला होता. सोमवारी तो मालकांच्या सांगण्यावरून दुकानातुन दिलेल्या मालाची उधारी आणण्यासाठी खिळद, पांढरवाडीफाटा, अंमळनेर, धामणगांव येथे आला. 3 लाख 11 हजार रूपये त्याच्या जवळ उधारी जमा केलेली रक्कम होती. धामणगांव वरून तो सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निघाला असता लाल रंगाची स्विफ्ट कार (Maruti Swift car) मध्ये दोघेजण पाळत ठेवून त्याचा पाठलाग करत होते.
दुचाकीवरून तो कड्याच्या दिशेने निघताच त्रिमुर्ती पेट्रोलपंपाच्या (Petrol Pump) जवळपास दुचाकीला अडवुन कारमधील दोघा जणांनी चाकुचा धाक दाखवून बोखारे कडील 3 लाख 11 हजार रक्कम घेऊन पाबोरा (Road Robbery) केल्याची घटना घडली आहे. आदेश गौतम बोखारे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आष्टीचे पोलिस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) रोहित बेंबरे याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक (PSI) आदिनाथ भडके पुढील तपास करीत आहेत.
( Road Robbery in Beed District; 3 lakh cash snatched by knife. )