Advertisement

वारकऱ्यांच्या गाडीला अपघात

प्रजापत्र | Monday, 11/07/2022
बातमी शेअर करा

बीड दि.११ (प्रतिनिधी )-जिल्ह्यात वारकऱ्यांच्या वाहनाचा अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झाला असून त तर अकरा जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदरील अपघात सोमवारी (दि.११) पंढरपूर वारीहून परतत असताना आष्टी तालुक्यातील हाकेवाडी जवळ झाला. काल आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेऊन १५वारकरी पिकअप गाडीने आपल्या गावी परत निघाले होते. पैठण बारामती रोडवरील हाकेवाडी नजीक रोडवर खडीचा ढिगारा न दिसल्याने वाहन पलटी होवून अपघात  झाला. या अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मुत्यू झाला. तर तीन गंभीर जखमी झाले असून अन्य अकरा किरकोळ जखमी आहेत. 

 

 

          सदरील घटना आष्टी तालुक्यातील हाकेवाडी येथे रविवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास घडली. रावण सखाराम गाडे (वय वर्ष 50) रा. धगरवाडी ता. पाथर्डी असे मृत वारकऱ्यांचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी गावा अंतर्गत येणाऱ्या धनगरवाडी येथील भाविक पंढरपूर वारीला गेले होते. रविवारी ते तिथुन पिकअप (क्र एम.एच 16, सी.सी.0381) मध्ये बसुन गावाकडे परतत होते. पैठण बारामती रोडवरील आष्टी तालुक्यातील हाकेवाडी गावा जवळ रोडला लागुनच अज्ञात व्यक्तीने खडी टाकली होती. वेगात असताना रविवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास अचानक तो ढिगारा चालकांला दिसला नसल्याने पिकअप उलटून झालेल्या अपघात झाला. गंभीर जखमींना अहमदनगर  येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले.

 

घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  रोहित बेंबरे, पोलिस अंमलदार शिवदास केदार, टकले यांनी भेट देऊन पंचनामा केला. हे सर्व भाविक पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी घरातुन पायीदिंडी सोहळ्यात गेले होते.. दर्शन आवरून परत घराकडे येताना अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असतानाच एका वारकऱ्याचा मृत्यु झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
 

Advertisement

Advertisement