Advertisement

रामकृष्ण बांगर यांच्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

प्रजापत्र | Sunday, 10/07/2022
बातमी शेअर करा

बीड-पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक रविवारी (दि.१०) पार पडली.सकाळी मतमोजणी आणि सायंकाळी ७ वाजता निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या शेतकरी विकास पॅनलने गोपीनाथ मुंडे आघाडी पॅनलचा दारुण पराभव केला आहे.१३ उमेदवारांपैकी २ उमेदवार आधीच बिनविरोध निघाल्यानंतर ११ उमेदवार रविवारी दणदणीत मतांनी विजयी झाले.सुशीला मोराळे,किरण बांगर आणि सुरेश वनवे यांच्या पॅनलचा या निवडणुकीत दारुण परभव झाल्यानंतर गावात मोठ्या उत्साहात बांगर समर्थकांकडून जल्लोष सुरु आहे. 

 


               

    भायाळा सेवा सोयायटीची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात होती.सहकारमहर्षी रामकृष्ण बांगर यांच्या शेतकरी विकास पॅनलकडून बांगर शहादेव महादेव,पाखरे बबन कुंडलिक,बांगर दिनकर सीताराम,बांगर नामदेव ज्ञानोबा,बांगर महादेव भीमराव,बांगर महादेव पाटीलबुवा,बांगर विश्वनाथ सदाशिव,बांगर सुखदेव नामदेव,सांगळे रामकिसन सोपान,बांगर चंद्रकला दिलीप,बांगर शांताबाई दादासाहेब यांनी निवडणूक लढविली होती.यातील सर्व उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले असून सुशीला मोराळे,किरण बांगर आणि सुरेश वनवे यांच्या गोपीनाथ मुंडे आघाडी पॅनलचा दणदणीत पराभव झाला आहे. 
 

Advertisement

Advertisement