Advertisement

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील अमरनाथ यात्रेला गेलेले ३९ भाविक अडकले

प्रजापत्र | Saturday, 09/07/2022
बातमी शेअर करा

आष्टी (प्रतिनिधी) - आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील ३८ आणि सांगवी पाटण येथील १ असे एकूण ३९ भाविक दि. ५ जुलै रोजी अमरनाथ यात्रेला गेले होते.अमरनाथ गुहेजवळ अचानक ढगफुटी होऊन पूरग्रस्तस्थिती निर्माण झाल्याने यात्रेसाठी गेलेले बाबा बर्फाणी यांच्या गुहेजवळ ११ भाविक अडकले असून त्यातील २८ भाविक हे खाली असलेल्या बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप आहेत.

            आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून ३९ भाविक भक्त अमरनाथ यात्रेसाठी बर्फाणी बाबा यांच्या दर्शनासाठी गेले होते.त्यातील २८ भविक भक्त बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप असून त्यातील ११ जण हे वरतीच अडकले होते.अडकलेल्या ११ जणांशी संपर्क झाला असून अडकलेल्याना भारतीय सैनिकांच्या एनडीआरएफ जवानांच्या मदतीने सुरक्षित स्थळी आणण्याचे युद्धपातळीवर काम सुरू असून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने खाली बालटल या ठिकाणी आणण्यात येणार आहे.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ आ.सुरेश धस, यांनी अडकलेल्या भावीकांना दूरध्वनीवरून संपर्क साधून धीर देत काही मदत लागल्यास तात्काळ संपर्क करावा त्यांनी सांगितले.

 

आम्ही सर्व सुखरूप मात्र अजून २ जण वरती हेलिकॉप्टरच्या प्रतीक्षेत हेलिपॅडवर

बालटल येथे असलेल्या काका पोकळे या भाविकाशी आमचे प्रतिनिधी प्रविण पोकळे यांनी संपर्क केला असता.ते म्हणाले आम्ही बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप पोहचलो आहोत मात्र आमचे ११ जण मागे राहिले होते.आम्ही सर्व दर्शन करून परतीला निघालो असता अर्ध्या तासाने गुहेजवळ अचानक ढगफुटी झाली.त्यात आमच्या सोबत असलेले वयोवृद्ध आणि काही जास्त वजनाचे असल्याने थांबत थांबत चालत असल्याने ते मागे राहिले होते.यांच्यात आणि आमच्या मध्ये २ ते ३ किलोमीटरचे अंतर होते.त्याचवेळी ढगफुटी झाली आणि ती ११ जणांनी समोर पाहिली मात्र दुर्देवाने कोणतीच जिवीतहानी झाली नसून आम्ही सर्व सुखरूप आहोत.११ पैकी ९ जण बालटल येथे हेलिकॉप्टरने आले असून २ जण हेलिपॅडवर हेलिकॉप्टरच्या प्रतीक्षेत रांगेत थांबले आहेत.राहिलेल्या २ जणाबरोबर आमचा सारखा संपर्क चालू असून ते थोड्याच वेळात आमच्या जवळ येतील.त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील देवळाली येथील ५० भाविक देखील बालटल येथे आमच्या जवळ तंबूत सुखरूप आहेत.

 

 

हे ११ भाविक अडकले होते.

संतोष मरकड,सूरज वाडेकर,भाऊसाहेब पोकळे,

भरत चौधरी,बापू शिंदे,छाया शिंदे,प्रयागा पोकळे,

,मनिराम खोजा,अशोक मंडा,किरण थोरवे

उषा पोकळे हे ११ भाविक अडकले होते.

Advertisement

Advertisement