Advertisement

बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचा वाजला बिगुल

प्रजापत्र | Friday, 08/07/2022
बातमी शेअर करा

बीड : राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात बीड,जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांसाठी ऑगस्टमध्ये मतदान होणार आहे. 
राज्यातील नगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रमांची घोषणा अखेर राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे आता राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई , परळी, माजलगाव , धारूर  आणि गेवराई नगरपालिकांच्या समावेश आहे. 
या नगरपालिकांसाठी १८ ऑगस्टला मतदान होणार आहे.  यासाठीच निवडणूक कार्यक्रम २० जुलै रोजी जाहीर होणार आहे. तर २२ ते २८ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. ४ ऑगस्टपर्यंत माघार घेता येणार असून १८ ऑगस्टला मत्तदान आणि १९ ऑगस्टलमतमोजणी होणार आहे. 

Advertisement

Advertisement