आष्टी दि.७ (वार्ताहर)-तालुक्यातील खडकत येथे पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या कत्तलखाना गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र याठिकाणी कारवाई होत नव्हती. अखेर बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी पहाटे छापा टाकून २१ गायी आणि पाच वासरे यांची सुटका करून या कत्तल खान्यावर कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान बीडचे पोलीस आष्टीत जाऊन कारवाई करत असताना स्थानिक पोलीस मात्र याकडे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करत असल्याच्या चर्चा आहेत.
तालुक्यातील खडकतमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पहाटे छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी २१ गाई आणि ५ वासरे आढळून आले. पोलिसांनी मुजाहीद जब्बार पठाण (वय-४५), आतिक मुनीर कुरेशी (वय-३०, दोघे रा. खडकत) यांना ताब्यात घेतले तर एक जण पळून गेला. या कारवाईत ७ लाख ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान शेकापूर येथील गोशाळेत सर्व गाई व वासरे देण्यात आले आहेत.ही कारवाई एलसीबीची सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस उपनिरीक्षक दुलत,पोलीस उपनिरीक्षक तुपे, पोलीस हवालदार शिरसागर, गोले, नशीर शेख, कैलास ठोंबरे, पोलीस नाईक प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, राहुल शिंदे, सतिष कातखडे,जमदाडे, पोलीस शिपाई अलीमशेख चालक कदम,हराळे, तांदळे आदी पथकाने केली.