बीड : पोलीस दलातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बहुप्रतीक्षित बदल्यांचे आदेश अखेर जारी झाले असून बीड जिल्ह्यात ३ पोलीस निरीक्षक नव्याने येणार आहेत तर एका पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे.
बीड जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या पोलीस निरीक्षकांमध्ये मिलिंद बाहकर (अकोला ) हे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी तर सलीम आमेर चाऊस (पुणे ) आणि शेषराव उदार (औरंगाबाद ) येथून येत आहेत तर बीडचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे मधुकर साळवे यांची अहमदनगरला बदली झाली आहे. एपीआयच्या बदल्यांमध्ये मात्र बीड जिल्ह्यातील कोणाची बदली झालेली नाही किंवा बीडला कोणाची नियुक्ती झालेली नाही. या बदल्या पोलीस महासंचालक स्तरावरील असून आता संबंधित परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पातळीवर बदल्या अपेक्षित आहेत.
बातमी शेअर करा