Advertisement

चाकूचा धाक दाखवून पेट्रोल पंपात चोरी

प्रजापत्र | Thursday, 29/10/2020
बातमी शेअर करा

नागझरी, राक्षसभुवन फाटा येथील इंडियन ऑइल कंपनीच्या किर्ती हायवे सर्व्हिसेस या पेट्रोल पंपावर दि. 24 च्या मध्यरात्रीच्या वेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चार चोरट्यांनी मॅनेजर व कर्मचारी यांना मारहाण करत चाकूचा धाक दाखवून मॅनेजरजवळील रोकड लंपास केली.
रात्री पावणेदोन च्या सुमारास हा प्रकार घडला. एक कर्मचारी ऑफिस बाहेर ड्युटीवर होता व मॅनेजर ऑफिस मध्ये झोपला होता. यावेळी अचानक दोन दुचाकीवर चौघेजण आले. त्यातील दोघांनी ऑफिस बाहेरील कर्मचाऱ्यास जमिनीवर पडलेले पेव्हर ब्लॉक हाताने उगारून मारण्याची धमकी दिली व गप्प बसण्यास सांगितले,
त्याचवेळी दुसऱ्या दोघांनी पेव्हर ब्लॉक ने ऑफिस चा काचेचा दरवाजा फोडला व कडी उघडून आत गेले. पेट्रोल पंपाच्या ऑफिस मध्ये झोपलेल्या मॅनेजरला जाग आली परंतु समोर दोन चोरट्यांनी चाकू लावला आणि कॅश ची मागणी केली. जीव वाचविण्याच्या भीतीने त्याने जवळील कॅश देऊन टाकली.
तेवढ्यात बाहेरील कर्मचाऱ्याने चोरांना धक्का देऊन पळ काढला व आरडा ओरडा केला आणि त्याक्षणी चोरट्यांनी भिऊन दुचाकींवरून पळ काढला व गेवराई च्या दिशेने पळून गेले.
सदरील प्रकरणाची नोंद गेवराई पोलीस स्टेशनला झाली असून स.पो.नि. तडवी व LCB चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

 

खाली या प्रकरणाची  विडिओ बातमी बघा

 

 

 

Advertisement

Advertisement