व्यापारांनी अघोषित संप पुकारल्यामुळे तोडगा काढण्यासाठी पवार करणार मध्यस्थी
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढला. यानंतर ते आता नाशिक दौरा करणार आहेत. हा दौरा कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेण्यासाठी केला जात आहे. शरद पवार त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. कांदा व्यापारांनी अघोषित संप पुकारल्यामुळे तोडगा काढण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार आहेत. दुपारी 1 वाजता ते नाशिकमध्ये पोहोचणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे. कांदा साठवणीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा अघोषित संप सुरुच आहे. यावर आता पवार आज तोडगा काढतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवारांनी मंगळवारी स्पष्ट केले होते की, मी नाशिकला जाणार आणि कांदा उत्पादकांना भेटून त्यांची भूमिका जाणून घेणार आहे. तसेच केंद्र सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचे ते म्हणाले आहेत. आयातीला पाठिंबा आणि साठा करण्यासाठी मर्यादा हे धोरण आहे.