Advertisement

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Tuesday, 28/06/2022
बातमी शेअर करा

माजलगाव - कर्जबाजारी झालेल्या एका 40 वर्षीय शेतकर्‍याने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी माजलगाव तालुक्यातील जदीद जवळा येथे घडली. घटनेची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना मिळताच घटनास्थळी ग्रामीणचे भागवत शेलार, राठोड यांनी भेट देऊन पंचनामा केला.

 

 

मुरलीधर बापूराव कबले (रा. जदीदजवळा, वय 40 वर्षे) या शेतकर्‍याला सहा एकर जमीन आहे. मात्र ती जमीन कोरडवाहू असल्याने गेल्या काही वर्षांपासून त्यात पिकलं नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या मुरलीधर यांनी आज सकाळी स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुरलीधर कबले यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्याकडे खासगी सावकारांसह बँकेचे कर्ज असल्याने ते कसे फेडायचे या चिंतेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.
 

Advertisement

Advertisement