Advertisement

कुसळंबमध्ये दोन घरे फोडली

प्रजापत्र | Monday, 27/06/2022
बातमी शेअर करा

पाटोदा, (प्रतिनिधी) :- पाटोदा तालुक्यातील आदर्शगाव कुसळंब येथे रात्री दिडच्या सुमारास अज्ञात चोराने कुसळंब येथे दोन घरे फोडली असून नागरिकांवर चाकूने वार केले आहेत यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.सविस्तर माहिती आशी की कुसळंब येथील योगेश हुलजुते यांच्या घरावर रात्री एकच्या सुमारास चार ते पाच जनाच्या टोळीने घराचे दरवाजे तोडून घरात असलेल्या महिलांवर चाकूने वार करत घरातील एक लाख रुपयाचे दागिने व रोख स्वरूपात काही रक्कम सामान लुटले असून यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे तर दुसरे दत्तात्रेय पवार यांचे अमळनेर रोड वरील घर फोडले असून साहित्याची नासधूस करत पैसे व पन्नास हजाराचे दागिने चोरी गेल्याची माहिती दिली आहे. रात्रीच पोलिसांचे पथक कुसळंब मध्ये हजर झाले होते. अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, एलसीबीचे बाघ साहेब. कुकलारे साहेब, फिंगर प्रिंट, डॉग स्कॉड, पीएसआय राहुल पतंगे, डोके साहेब, सानप, तांदळे, सोनवणे इत्यादी कर्मचारी या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांचा अतिदक्ष पणा नागरिकांना भावला! कुसळंब येथे झालेल्या रात्रीच्या धाडसी चोरीत नागरिकांनी पोलिसांना फोन करतात पोलिसांचे पथक २० मिनिटात कुसळंब मध्ये हजर होऊन तपासाला सुरुवात केल्याने नागरिकांना पोलिसांचा अतिदक्ष पणा भावला असून पोलीस कर्मचान्यांचे कौतुक केले जात आहे.
 

Advertisement

Advertisement