दिल्ली : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटिस बजावून त्यांना आज खुलासे करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्षांनी दिले होते. मात्र आता त्या बंडखोरांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. हे आमदार ११ जुलैपर्यंत आपले उत्तर विधानसभा उपाध्यक्षांकडे सादर करू शक्ती. म्हणजे एका अर्थाने आता या बंडखोरांना ११ जुलै पर्यंत जीवदान मिळाले आहे. मात्र त्याचवेळी अविश्वास ठराव आला म्हणून उपाध्यक्षाना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत , हा दावा न्यायालयाने आज मान्य केलेला नसून यावर ११ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. त्याला या बंडखोरांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्या बंडखोरांना विधानसभा उपाध्यक्षांसमोर आपले म्हणे मांडण्याचे आदेश दिले असून त्यासाठी ११ जुलैच्या मुदत दिली आहे . यामुळे बंडखोरांना तात्पुरते जीवदान मिळाले असले तरी त्यांना विधानसभा उपाध्यक्षांसमोर हजर व्हावे लागेल हे नक्की
बातमी शेअर करा