Advertisement

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई

प्रजापत्र | Friday, 24/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच शिवसेनेला एकावर एक धक्के बसत आहेत. एकाबाजूला शिंदे गटाचे मोठे बंड, दुसऱ्या बाजूला अनिल परब यांची ईडीकडून सलग चौकशी सुरू असताना, यात भर म्हणून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या साखर कारखान्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. यामध्ये कारखान्याची जमीन आणि यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे. काही दिवसांपूर्वी याच कारखान्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता.

Advertisement

Advertisement