Advertisement

डोळ्यात मिरची टाकून शेतकऱ्यास लुटले

प्रजापत्र | Friday, 24/06/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.24 जुन – माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील दोन शेतकरी येथील एका बँकेतून पैसे घेऊन जात असताना चोरट्यांनी कॅनल जवळ मोटर सायकल अडवुन व त्यांच्या डोळ्यात मिरची टाकत मारहाण केली. त्यांच्याजवळील साडेतीन लाख रुपये लुटण्यात आले.

 

उसाचे बिल आल्याने लोणगाव येथील जनार्धन कोळसे व गजानन कोळसे हे दोन बंधू पूर्णवादी बँकेतुन सव्वातीन लाख रुपये काढून गावाकडे मोटारसायकलवर ( एम.एच.2 ए.एस.0028 ) जात असताना माजलगाव – पात्रुड रस्त्यावरील कँनल जवळ तिघेजण मोटरसायकलवरून आले. या दोन बंधुंच्या मोटरसायकलला मोटार सायकल आडवी लावत त्यांच्या डोळ्यात मिरची टाकली व थैली देण्यास प्रतिकार करताच त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.

 

या झटापटीत कोळसे बंधूंच्या हातातील पैशाची थैली खाली पडली. त्यानंतर या अज्ञात तीन चोरट्यांनी पैसे घेऊन पसार झाले. ही बाब ग्रामीण पोलीसांना कळवताच पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. अद्याप चोरट्यांचा पत्ता लागला नसून शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

 

( In Majalgaon, a farmer was robbed by throwing pepper in his eye; Three and a half lakh cash was stolen. )

Advertisement

Advertisement