बीड - पत्नीचे फेसबुक अकाऊन्ट बनवून पतीने त्यावर तिच्या मामाबद्दल बदनामीकारक पोस्ट केली. याबाबत माहिती मिळताच पत्नीने बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात धाव घेत पती विरोधात गुन्हा नोंदवला.
हेमंत रंगनाथ शिंदे (रा. काळेवडी, पुणे) असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नी दिक्षा (ह.मु. सारनाथ कॉलनी, शाहू नगर, बीड) यांच्या फिर्यादीनुसार, दहा वर्षापूर्वी त्या दोघांचे लग्न झाले. परंतु, २०१८ पासून पती-पत्नीचा न्यायालयात वाद सुरु आहे. बुधवारी (दि.२२) हेमंतने दिक्षाचूं नवे फेसबुक अकाऊन्ट तयार केले आणि त्यावरून तिचे मामा गौतमराव नारायणराव चोपडे यांचा बदनामीकारक फोटो पोस्ट करून त्यावर आक्षेपार्ह्य लिखाण करून हे कृत्य दिक्षा यांनींचे केल्याचे दर्शविले. सदर फिर्यादीवरून हेमंत शिंदे याच्यावर शिवाजीनगर ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.