Advertisement

तळेगाव शिवारातील वस्तीवर दरोडेखोरांची लुटमार

प्रजापत्र | Thursday, 23/06/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२३ (प्रतिनिधी)-तालुक्यातील तळेगाव शिवारात गुरुवारी (दि.२३) पहाटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला.यावेळी चौघांनी केलेल्या मारहाणीत माय-लेकरू गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या वस्तीवरून लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून आज सकाळी घटनास्थळी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. वाघ, आणि ग्रामिणचे पो. नि. साबळे यांनी भेट दिली. श्वान पथक, ठसे तज्ञानांही पाचारण करण्यात आले होते.

      बीड तालुक्यातील तळेगाव शिवारातील एका वस्तीवर अज्ञात दरोडेखोरांनी धुडघूस घातला. यावेळी दरोडेखोरांनी अनिता चंद्रकांत गायकवाड (वय ५०) यांना रॉडने आणि कुन्हाडीने मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडुन घेतले. त्याचवेळी त्याचा मुलगा सदेश चंद्रकांत गायकवाड (वय २३) यालाही बेदम मारहाण केली. घरातील सामानाची नासधुस करून चोरटे पसार झाले. यामध्ये चोरट्यांच्या मारहाणीत दोघे माय-लेक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती कळताच पहाटे ४ वाजता अप्पर पोलीस अधिक्षकसुनिल लांजेवार यांनी भेट दिली. त्यानंतर ठसे तज्ञ, श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते.
 

Advertisement

Advertisement