Advertisement

राजेंद्र मस्केंच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात प्रथमच बैलगाडी शर्यत

प्रजापत्र | Sunday, 19/06/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१९ (प्रतिनिधी)-भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात प्रथमच भव्य स्वरुपात हौशी शेतकरी बांधवांसाठी  बैल गाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना शानदार मोटारसायकल बक्षीस देण्यात येणार आहे. या शर्यतीत राज्यभरातील बैलगाडा स्पर्धक सहभागी होणार आहेत. या धडाकेबाज शर्यतीकडे बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि बैलगाडी शर्यत रसिकांचे लक्ष लागले असून ही शर्यत १ जुलै  रोजी सकाळी ९ वा. चौरे वस्ती शिवार तळेगाव (ता.जि.बीड) येथे होणार आहे. 
        बीड जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचा २ जुलै वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो. मागील दोन वाढदिवस कोरोना आपत्तीमुळे अत्यंत साधे व सेवा कार्याच्या माध्यामातून साजरे करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा गाजा वाजा चालू असताना, आपल्या जिल्ह्यात हि भव्य स्वरुपात बैल गाडा शर्यत आयोजित करून शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी ही शर्यत आयोजित केली आहे. या शर्यतीमध्ये  विजेत्या बैलगाडी धारकाला मोटारसायकल बक्षीस देण्यात येणार आहेत.ही शर्यत १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता चौरे वस्ती शिवार तळेगाव येथे  भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शर्यतीचा शुभारंभ होणार आहे.

 

ही आहेत बक्षिसे... 
या शर्यतीसाठी प्रथम बक्षीस होंडा शाईन, व्दितीय बक्षीस पॅशन प्रो, तृतीय बक्षीस प्लॅटिना (बजाज) मोटरसायकल असे आकर्षक  बक्षीसे यावेळी देण्यात येणार आहेत.तरी  बैलगाडी शर्यत हौशी शेतकरी बांधवांनी संघर्ष योद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय बीड येथे संपर्क साधून नाव नोंदणी करावी. असे आवाहन राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.नाव नोंदणीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा- ९८६०९११०९९, ९३५९००५८७९, ९१३०८८७८८८
 

Advertisement

Advertisement