Advertisement

महिला नायबतहसिलदारावर कार्यालयातच हल्ला

प्रजापत्र | Monday, 06/06/2022
बातमी शेअर करा

 

केज दि. ६ - येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या नायब तहसिलदार आशा वाघ गायकवाड यांच्यावर कार्यालयातच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.
            सदरील हल्ला हा त्यांच्या भावानेच केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तहसीलदार आशा वाघ ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून हल्लेखोरास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement