Advertisement

अपंगाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या

प्रजापत्र | Sunday, 05/06/2022
बातमी शेअर करा

तलवाडा-तलवाडा सर्कलमधील पांढरी येथील एका ४० वर्षीय इसमाने अपंगाच्या आजाराला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.४) रात्री घडली.याप्रकरणाची तलवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 
         शंकर अर्जुन कांबळे (वय-४०) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.शंकर कांबळे हे एका पायाने पूर्णपणे अपंग होते.मोलमजुरी करून त्यांना आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवावी लागत असे.त्यात अपंगाचा आजार असल्याने काम होत नव्हते.याला कंटाळूनच त्यांनी स्वतःचे जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. 

 

Advertisement

Advertisement