Advertisement

बोअरवेलच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

प्रजापत्र | Tuesday, 31/05/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.३१ (वार्ताहर)-तालुक्यातील नित्रुड येथे शेतातील सामायिक बोअरच्या पाण्यावरून झालेल्या वादातून तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना माजलगांव येथील अपर सत्र न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी मंगळवारी (दि.३१) आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. साडेचार वर्षापूर्वी नित्रुड येथे घडलेल्या घटनेच्या खटल्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागेल होते. बंडु उत्तम डाके आणि शिवा उत्तम डाके (दोघेही रा. नित्रुड, ता. माजलगांव) अशी त्या शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची नाव आहेत. 

 

 

        २० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ६ वाजताच्या वाजण्याच्या सुमारास कापसाला पाणी देण्यासाठी जांभळीच्या शेतात सामायिक बोअरवेलची मोटर सुरु करण्यासाठी गेलेल्या भागवत बाबुराव गायके याचा खून झाला होता. बोअरच्या पाण्यावरून झालेल्या वादातून बाळासाहेब उर्फ बंडू उत्तम डाके, शिवाजी उत्तम डाके, दिनकर किसन उर्फ लाला डाके आणि दत्ता माणिक डाके या चौघांनी दगडाने आणि कोणत्यातरी शस्त्राने वार करून भागवतचा खून केला अशी फिर्याद त्याची आई कौशल्या बाबुराव गायके यांनी दिल्यानंतर चारही आरोपींवर दिंद्रुड ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. दिंद्रुड पोलिसांनी तपास पूर्ण करून माजलगाव अपर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सदर केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण२२ साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रताप महादेव बडे यांच्यासह सर्व २२ साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. एस. पी. देशमुख यांनी बंडु उत्तम डाके आणि शिवा उत्तम डाके या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व ४० हजार रुपेय दंडाची शिक्षा ठोठावली. तर, उर्वरित दोन आरोपी दिनकर किसन उर्फ लाला डाके आणि दत्ता माणिक डाके यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

 

 

या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने गाजलगाव येथील सहाय्यक सरकारी वकील रणजीत वाघमारे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. पी. एन. मस्कर, अॅड. एन. एस. पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच सरकारी वकीलास सहकार्य म्हणून अॅड. डी. ए. वायकर, तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरिक्षिक सय्यद असीफ व पैरवी अधिकारी पो उपनिरिक्षक व्ही.सी. जाधवर व पी. डी. नरवडे यांनी सहकार्य केले.

Advertisement

Advertisement