Advertisement

गोळीबाराने हादरले तालखेड

प्रजापत्र | Monday, 30/05/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.30 मे – माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे एका परप्रांतिय व्यक्तीकडून गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली. या गोळीबारात एक जण जखमी झाला असून गोळीबार करणाऱ्यास गावकऱ्यांनी बेदम चोप दिला आहे. सदर घटना सोमवारी (दि.30) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे पाच वाजण्याच्या सुमारास साखर कारखान्याचा पट्टा पडल्यामुळे काही युवक रस्त्यावर नाचत होते. तेवढ्यात एका स्कॉर्पिओ गाडीतून तीन ते चार परप्रांतिय व्यक्ती होते. त्यातील एका व्यक्तीने खाली उतरून नाचणाऱ्या दोन -तीन युवकांना मारहाण केली. यावेळी सदर परप्रांतिय व्यक्तीने थेट गोळीबार केला.

 

ही घटना गावात कळताच गावातील युवक जमा झाले व स्कॉर्पिओला ट्रॅक्टर आडवे लावून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीस गाडी बाहेर काढून कपडे काढून बेदम चोप दिला. यावेळी स्कॉर्पिओ मधील इतर सर्व जण पळून गेले. या झालेल्या गोळीबारात साहेबराव जाधव हा 35 वर्षीय युवकाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस (Police) घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे कळते.

 

( Thrilling … Shooting in Majalgaon taluka by foreigners; One seriously injured. )

Advertisement

Advertisement