Advertisement

धारुर पोलिस ठाण्यातील तब्बल आठ कर्मचाऱ्यांची बदली

प्रजापत्र | Monday, 30/05/2022
बातमी शेअर करा

किल्ले धारूर दि.३० (वार्ताहर) - बीड जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून जिल्ह्यातील २९३ पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धारुर पोलिस ठाण्यातील तब्बल आठ कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली झाली असून नवीन सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

बीड पोलिस दलात दि.२६ रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशाने वार्षिक प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. यात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील ३० पोलिस अंमलदार, ७३ पोलिस हवालदार (Head Constable) , १०८ पोलिस नाईक तर ८२ पोलिस शिपायांचा समावेश आहे. धारुर पोलिस ठाण्यातील एका अमंलदारासह दोन हवालदार, पाच नाईक अशा आठ जणांची बदलीचे आदेश आले आहेत.

 

या कर्मचाऱ्यांची बदली...

बाबू सोमाजी चव्हाण, (अंमलदार ) पिंपळनेर, आलमखान गुलाबखान पठाण (हवालदार ) पाटोदा, देसाई केशवराव घुले (हवालदार) केज, हनुमंत रंगनाथ कातकडे (नाईक) अंबाजोगाई शहर, गोकुळ नवनाथ रेंगे (नाईक) केज, सिताराम राधाकिसन वडमारे (नाईक) माजलगाव ग्रामीण, पांडूरंग श्रीमंत शिंदे (नाईक) शिवाजीनगर बीड, उल्हास हरिभाऊ राठोड (नाईक) केज.

 

या कर्मचाऱ्यांची धारुर येथे नियुक्ती...

रमाकांत सिध्दलिंग्गप्पा भुसारी (हवालदार) अंबाजोगाई ग्रामीण, विष्णू रामराव ठोंबरे (हवालदार) पिंपळनेर, अमरनाथ भास्कर घुले (नाईक) केज, सचिन सुरेशराव सिध्देश्वर (नाईक) बीड ग्रामीण, आशोक शांतीलाल गवळी (नाईक) केज, तुकाराम जयंत चांदणे (नाईक) पिंपळनेर, उलकाबाई विष्णू बनसोडे (महिला नाईक) युसूफ वडगाव.

 

जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशान्वये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले. येथील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना धारुर पोलिस ठाण्याचे प्रभारी विजय आटोळे यांच्या उपस्थित निरोप देण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरिक्षक एल. एस. घोडे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement