Advertisement

तुटलेल्या तारीचा करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यु

प्रजापत्र | Tuesday, 24/05/2022
बातमी शेअर करा

बीड  - शेतात विद्युत प्रवाह सुरू असलेली तार तुटून जमीनीवर पडली होती, ती एका वृद्ध शेतकर्‍याच्या निदर्शनास न आल्याने त्या तारेला चिकटून शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी बीड तालुक्यातील बाभळखुंटा येथे घडली.

 

त्र्यंबक नामदेव जाधव (वय 70 वर्षे, रा. बाभळखुंटा) हे शेतकरी आज सकाळी त्यांच्या बाभळखुंटा शिवारातील शेतात गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेतातून जाणार्‍या विद्युत पोलची एक तार तुटून जमीनीवर पडली. त्या तारेत विद्युत प्रवाह सुरू होता. ते त्र्यंबक जाधव यांच्या लक्षात न आल्याने त्याचा शॉक जाधव यांना लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी मृतदेह आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आला होता.

Advertisement

Advertisement