Advertisement

व्यापाऱ्याच्या गोडाउनवर सापडला ५२ हजाराचा गुटखा

प्रजापत्र | Saturday, 21/05/2022
बातमी शेअर करा

परळी - शहरातील विद्यानगर भागात एका गोडाऊनमध्ये विक्री करण्यासाठी ठेवलेला प्रतिबंधीत गुटखा शहर पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी शहरातील एका व्यापाऱ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

  परळी शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने गुटख्याच्या तस्करीचे प्रकार समोर येत आहेत. मोठ्या प्रमाणावर परळीतून जिल्हाभरात गुटखा पुरवला जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी परळी शहर पोलिसांना विद्यानगर भागातील एका गोदामात एका व्यापाऱ्याने गुटख्याचा साठा करुन ठेवल्याची माहिती मिळाली.शहर पोलिसांनी धाड टाकली असता प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा ५२ हजार ६५० रुपयांचा गुटखा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिस शिपाई गोविंद भताने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांत विजयकुमार रतनलाल लोढा (रा. विद्यानगर, परळी) या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. 
 

Advertisement

Advertisement