बीडः शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठे आहे, त्यांना विम्यासोबतच भरघोस मदतही मिळाली पाहिजे असे माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या. बीड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागाला भेट देण्यासाठी आलेल्या पंकजा मुंडे बीडच्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी बीडमधील पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तब्बल ८ महिण्यानंतर बीड जिल्ह्यात आलेल्या पंकजा मुंडे यांचे जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या बळीराजाप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी मी आले आहे.शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालय. त्याला मदत करण्याची भूमिका सरकारने घेण्याची गरज आहे. पण ९९% भागात पंचनाम्याला लोक पोहचलेले नसल्याचे चित्र आहे. जिथे झालेत तिथे वरवरचे पंचनामे होताहेत. अशावेळी शेतकऱ्यांना सरसकट मदत झाली पाहिजे. विमा तर मिळावाच पण भरघोस मदतही मिळाली पाहिजे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
त्यांच्यासोबत आ. लक्षमण पवार,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, गोविंद केंद्रे , अक्षय मुंदडा, रमेश पोकळे, भिमराव धोंडे,केशव आंधळे, मोहन जगताप,राम कुलकर्णी आदींची उपस्थिती होती
मी अजुनही लवादात
ऊसतोड कामगारांचा संप सुरु आहे. मी अजुनही लवादात आहे. कामगारांच्या बाजुने आहे, आणि लवकरात लवकर याचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. सगळयांच ऐकून निर्णय घेऊ पण निर्णय लवादच घेणार आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
---
ऊस उत्पादकांची कोंडी
मी पाच वर्षे कधी निधीच राजकारण केलं नाही. कधी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले नाहित. वैद्यनाथ बद्दल सांगायचे चारपैकी तीन वर्ष कारखाना बंद राहिला आहे. अशा परिस्थितीत मी प्रयत्न करतेय. माझ्या परिसरात साडेचार लाख टन ऊस आहे. सरकारने थकहमी घेतली आहे. अशा परिस्थितीत कारखान्याच्या कर्जात अडचणी आणल्या जात आहेत. ही कारखान्याची नव्हे तर ऊस उत्पादकांची कोंडी आहे असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
-----------------