Advertisement

साठे चौकात ‘द बर्निंग’ कारचा थरार

प्रजापत्र | Thursday, 12/05/2022
बातमी शेअर करा

बीड : येथील साठे चौकामध्ये गॅरेजवरुन दुरुस्त करुन आलेल्या झायलो कारने (एम.एच.23 डी 7911) गुरुवारी (दि.12) रात्री 8.15 वा. अचानक पेट घेतला. त्यामुळे नागरिकांनी ‘द बर्निंग’ कारचा थरार पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे कारला लागलेली आग तातडीने विझविण्यात आली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

 

सुदाम बाबासाहेब काटुळे असे चालकाचे नाव असल्याची माहिती आहे. सुदाम काटुळे यांनी कार गॅरेजवर दुरुस्तीसाठी लावली होती. त्यानंतर ती कार दुरुस्त झाल्यानंतर ते जालना रोडवरुन प्रवास करत असताना साठे चौकामध्ये कार आली असता रात्री 8.15 च्या सुमारास कारच्या बॅटरीने पेट घेतला. त्यामुळे कारलाही आग लागली. नागरिकांनंी तातडीने ही आग विझविल्याने सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. दरम्यान धावत्या कारने पेट घेतल्यामुळे साठे चौकात बघणार्‍यांची गर्दी झाली होती. 

 

Advertisement

Advertisement