Advertisement

सामुहिक बलात्कार प्रकरणात चौघांना जन्मठेप

प्रजापत्र | Thursday, 22/10/2020
बातमी शेअर करा

बीडः गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या प्रकरणात चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीडचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश हेमंत महाजन यांनी हा निकाल दिला.
पाच वर्षापूर्वी पाचेगाव ता. गेवराई येथील एका २२ वर्षीय महिलेवर ती शेतातून येत असताना एरंडगाव शिवारात आणि पिडीतेच्या घराजवळ सामुहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी जिजा लालसिंग राठोड,अमोल मदन काष्टे, नवनाथ बाबुराव जाधव आणि   कुंडलिक बन्सी राठोड  यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. सदर प्रकरण बीडच्या प्रमुख जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण चालले. अभियोग पक्षाच्या वतीने १० साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत महिलेसह वैद्यकीय अधिकारी, ओळख परेड घेणारे नायड तहसिलदार आणि तपासी उप विभागीय पोलीस अधिकारी गौरवसिंह यांची साक्ष महत्वाची ठरली.
सरकार पक्षाचा पुरावा ग्राहयधरत प्रमुख सत्र न्यायाधिश हेमंत महाजन यांनी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अभियोग पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता मिलींद वाघिरकर यांनी बाजु मांडली.

Advertisement

Advertisement