Advertisement

शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रभर खडा पहारा

प्रजापत्र | Wednesday, 11/05/2022
बातमी शेअर करा

शिरूर दि.११ (वार्ताहर)-तालुक्यातील आनंदगावमध्ये एका वृद्धाची तीन दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती.यावेळी मारेकऱ्याने ‘जोपर्यंत माझ्या पत्नीचे मारेकरी मिळत नाहीत, तोपर्यंत खून करत राहणार, ’ अशा आशयाची चिठ्ठी' सोडल्यामुळे शिरूर तालुक्यातील अनेक गावातील लोकं रात्रभर जागे राहून खडा पहारा देत असल्याचे चित्र आहे.गावागावात अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

 

 शिरूर तालुक्यातील आनंदगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पीक घेण्यात येते. हिरव्यागार पिकामुळे हरिण आणि रानडुक्करांचा त्रासही वाढला आहे. पिकांचे रक्षण करण्यासाठी कुंडलिक विघ्ने (वय-६५) हे आपल्या शेतात रात्रीच्या जागरणासाठी गेले होते.यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांचा धारदार शस्त्राने खून करत हत्या केली.दरम्यान यावेळी   मारेकऱ्याने ‘जोपर्यंत माझ्या पत्नीचे मारेकरी मिळत नाहीत, तोपर्यंत खून करत राहणार, असे चिठ्ठी' घटनास्थळी सोडल्यामुळे खळबळ उडाली आहे.मंगळवारी रात्री गोमळवाडा परिसरात अज्ञात व्यक्ती धारदार शस्त्र हातात घेऊन फिरत असल्याची चर्चा सुरू झाली. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गोमळवाडा परिसर पिंजून काढला. त्यांच्या हाती काहीच लागले नाही. भीती, दहशत आणि अफवा यामुळे परिसरातले लोक रात्र जागून काढत असल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement