Advertisement

कारच्या धडकेत सोनिमोह्याचा तरुण ठार तर एक जखमी

प्रजापत्र | Tuesday, 10/05/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.10 मे - धारुर तालुक्यात दुपारी तेलगाव येथे ऊसाच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीवरिल सख्ख्या भावापैकी एक दगावला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तोच सोनिमोहा ते भोगलवाडी फाट्याच्या दरम्यान एका कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. यात एक ठार तर एक जखमी झाला आहे.

 

 

धारूर ते माजलगाव या राष्ट्रीय महामार्गावर भोगलेवाडी फाटा येथे  दुचाकीला कारने धडक दिली. या अपघातात सोनिमोहा येथील महादेव साहेबराव तोंडे (वय 38) व रघुनाथ वैजेनाथ तोंडे (वय 42) हे गंभीर जखमी झाले. महादेव तोंडे यास डोक्याला गंभीर मार लागल्याने अंबाजोगाई येथे उपारासाठी हलवण्यात आले. मात्र अंबाजोगाई येथे नेत असतांना रस्त्यातच त्याचे निधन झाले. 

 

 

सदरचा अपघात आज मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अपघात होताच कार चालकाने कार सुसाट पळवत पोबारा केला. हे दोन्ही तरुण आपल्या मोटारसायकलवरुन सोनिमोहा येथून भोगलवाडीकडे लग्नासाठी जात असल्याचे माहिती मिळाली. तरुण वयातील या घटनेमुळे  तोंडे कुंटूंबावर मोठे संकट कोसळले आहे.

 

 

गंभीर जखमी असलेल्या रघुनाथ तोंडे यांच्यावर माजलगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर पसार झालेल्या कार व कारचालकास तेलगाव येथे दिंद्रुड पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे कळते. घटनेची माहिती सोनिमोहा गावात कळताच ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे.

 

( Accident Day .. Another accident in Dharur taluka; Sonimoha's youth killed, one injured in car crash. )

Advertisement

Advertisement