Advertisement

सिरसाळा परिसरात गुटख्यावर धाड

प्रजापत्र | Friday, 06/05/2022
बातमी शेअर करा

 परळी वैजनाथ : गुटख्याची चोरटी विक्री करीत असलेल्या मिळालेल्या माहितीवरून सहाय्याक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी तालुक्यातील खामगाव शिवारात छापा टाकून लाखो रुपयांचा आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या तंबाखुजन्य साहित्य जप्त करीत सिरसाळा पोलीस ठाण्यात 3 व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

 

 

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खामगाव शिवारात अरुण मधुकर बडे,मधुकर बडे व सुभाष विठ्ठल बडे हे त्याचे रहाते घरी  राजनिवास गुटखा, प्रिमियम जाफरानी जर्दा  विक्री करण्यासाठी जवळ बाळगत असल्याच्या  माहितीनुसार माजलगाव उप विभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांच्या पथकाने शुक्रवार दि 6 रोजी सकाळी 11 वाजता आरोपीच्या खामगाव शिवारात छापा टाकून पांढ-या रंगाचे नायलॉनचे 12 मोठे शिवलेले पोते ज्या प्रत्येकी 1 एका भोतामध्ये 8 लहान पोते असे एकुन 12 पोत्यामध्ये 96 लहान पोते प्रत्येक पोत्या मध्ये प्रिमियम राजनिवास सुगंधित पान मसाला कंपनीचे 25 पुढे असे 2400 पुढे प्रति पुढा 192 रुपये प्रमाणे एकुण किंमती 4 लाख 60 हजार 800 रुपयांचा ऐवज व पांढ-या रंगाचे नायलॉनच्या 12 गोण्या प्रत्येत गोणीमध्ये 8 लहान नायलॉनच्या पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये 25 प्रिमीयम एकुण एल 01 जाफरानी जर्दा चे 2400 पुडे प्रत्येक पुडा 48 रुपये प्रमाणे एकुण किंमती 1 लाख 15 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल असा एकुण 5 लाख 76 हजार रुपयांचा राज्यात बंदी घातलेला तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात   अरुण मधुकर बडे,मधुकर बडे व सुभाष विठ्ठल बडे अशा 3 व्यक्तिविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप एकशिंगे हे करीत आहेत.

 

 

संभाजीनगर पोलिसांनीही जप्त केला गुटखा
परळी शहरात संभाजीनगर पोलिसांनी गुटख्यावर मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला असून  याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 जमजम कॉलनी मध्ये एका इसमाचे घरी गुटखा ठेवलेला आहे या माहितीवरून यावरुन पो.उप.नि. मेंढके, यांच्या पथकाने फेरोज शेख रा. जमजम कॉलनी परळी वै याचे घरी हाकीम हैदर कुरेशी याच्या ताब्यातून 1,35,200/- रु चा राजनिवास गुटखा, व सुगंधी तंबाखु, आर.एम.डी. पान मसाला तसेच जाफरानी जर्दा, इ.जप्त केले. हा गुटखा कोणाकडुन आनला असे विचारले असता पप्पु कदम रा.केज याचेकडुन आनला आहे असे सांगीतल्याने   हाकिम हैदर कुरेशी ,  पप्पु कदम रा.केज, फेरोज शेख रा.जमजम कॉलनी परळी यांचे विरुध्द   गुन्हा नोंद झाला आहे.

 

Advertisement

Advertisement