Advertisement

दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्याचाच दारूच्या नशेत राडा

प्रजापत्र | Thursday, 05/05/2022
बातमी शेअर करा

केज दि.५ – तालुक्यातील मस्साजोग येथे एका राज्य उत्पादन शुल्क विभागातील मद्यधुंद अवस्थेतील अधिकाऱ्याने मद्याच्या नशेत एका मोटार सायकल आणि एका कारला मागून धडक दिली यात मोटार सायकल स्वार जखमी झाले असून मोटासायकलीसह दोन्ही कारचे नुकसान झाले आहे.

 

 

              राज्य उत्पादन शुल्क लातूर विभागातील एक अधिकारी हे दि. ५ मे रोजी मित्राचे लग्न आटोपून नशेत तर्रर होवून गाडी क्र.(एम एच ०४/एच यू-५७५७) चालवीत असताना केज बीड महामार्गावरील मस्साजोग जवळ एका मोटार सायकलला मागील बाजूने जोराची धडक दिली त्यात अनमोल जोशी व श्रेया जोशी दोघे रा लातूर हे जखमी झाले. त्या नंतर पुढे (एम एच-१४/डी ए-६९९१) मधून भरत साळुंके हे चालवीत असलेल्या गाडीला त्या मद्यधुंद अवस्थेतील दारू बंदी अधिकाऱ्याने मागून धडक दिली. यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले. मात्र त्यातील भरत साळुंके (चालक) आणि परसराम हाके आणि त्यांची बहीण विद्या हाके हे तिघे बालंबाल बचावले.

 

 

                    दरम्यान दोन्ही गाड्याला धडक देवून दारूच्या नशेत तर्रर असलेले दारूबंदी अधिकारी हे पळून जात असल्याची माहिती केज पोलिसांना मिळताच सहाय्यक फौजदार वालवडकर, पोलीस अमलदार आश्रुबा मुरकुटे, धनपाल लोखंडे, दिलीप गित्ते, उमेश अघाव, शेख मतीन यांनी पाठलाग करून केज येथील कळंब चौकात सापळा लावून गाडी अडविली आणि त्या मद्यधुंद अवस्थेतील मद्यपी अधिकाऱ्याला अडवून त्याला पोलीस ठाण्यात आणले.

 

Advertisement

Advertisement