Advertisement

बीड-नाथापूर रोडवर टेम्पोने मोटारसायकलस्वाराला उडविले

प्रजापत्र | Friday, 26/04/2024
बातमी शेअर करा

बीड- तालुक्यातील नाथापूर रोडवरील राणुबाई नगर येथे टेम्पो चालकाने मोटारसायकलला उडविले. त्याला रूग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी उशीरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.
बीड तालुक्यातील उमरद येथील तरूण गोविंद श्रीकृष्ण घोलप (वय 25) हा सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जवळ्याकडून उमरीकडे मोटारसायकल (क्र.एम.एच.23-एम-1881) वरून जात असताना बीडकडून विटांचा टेम्पो (एम.एच.25-पी-0944) या टेम्पोने जोराची धडक दिली.यामध्ये मोटारसायकल उडून रस्त्याच्या बाजूला पडली. तर गोविंद घोलप हे एका बाजूला पडले. घटना घडताच आजूबाजूच्या लोकांनी गोविंद घोलप यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटना घडल्याचे कळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.गोविंद घोलप यांच्या पश्‍चात आई-वडील,एक भाऊ असा परिवार असल्याचे समजते. या प्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.घटनेची माहिती उमरी परिसरात कळताच गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

 

 

Advertisement

Advertisement