माजलगाव-येथील ईदगाह भागात जेसीबीने भिंत पाडल्याने त्याखाली दबून एका ७ वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना गुरुवारी (दि.२८) घडली होती. या प्रकरणात मुख्याधिकारी विशाल भोसले, जगदिश जाधवर यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे भाऊ तथा जेसीबी मालक भाऊ श्रीरंग भोसले याला शुक्रवारी (दि.२९) दुपारी उशिरा माजलगाव पोलीसांनी परांडा तालुक्यातुन अटक केली.
माजलगाव येथील सय्यद इकरा सय्यद निसार या बालिकेचा भिंतीखाली दबल्याने मृत्यु झाला होता. या प्रकरणात सय्यद निसार यांच्या फिर्यादीवरून माजलगावचे मुख्याधिकारी विशाल भोसले, जगदीश जाधव, महादेव आण्णासाहेब जाधव यांच्यासह स्वच्छता ठेकेदार आणि जेसीबी मालक या ५ जणाविरूध्द कलम २७९,३०४ (अ), ३४ भांदवी सह कलम ३/१३४,५/१३४ प्रमाणे माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील जेसीबी मालक भाऊ श्रीरंग भोसले हे मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे भाऊ असुन त्याला शुक्रवारी (दि.२९) दुपारी उशिरा अटक केली आहे.
प्रजापत्र | Friday, 29/04/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा