बीड दि.२८ - दि.03.04.2022 रोजी 09.30 वा सुमारास लाहेवडगाव ता. केज शिवारात होळ ते आडस जाणारे रोड लगत विठठल मारुती मांडे यांचे शेतात एक अनोळखी इसमाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यास शेतातील ज्वारीचे कडब्या मध्ये जाळल्याने अर्धवट जळालेले प्रेत सापडले होते.
सदर अनोळखी मयताचे दोन्ही हात व दोन्ही पाय पुर्णपणे जळालेले होते. फक्त गुडघ्यापासून डोक्या पर्यतचा भाग अर्धवट जळालेला होता. एकंदरीत सदर अनोळखी व्यक्तीचे प्रेत 80% जळाले होते. कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन अज्ञात ठिकाणी खून करून सदर मयताचे प्रेत जाळल्याने पोलीस ठाणे युसुफ वडगाव चे प्रभारी अधिकारी एस. व्ही. दहिफळे, सहा पोलीस निरीक्षक यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे युसुफ वडगाव गुरनं 51/2022 कलम 302, 201 भादवी प्रमाणे दि.03.04.2022 रोजी 22.09 वा गुन्हा दाखल होऊन तपास केला आहे.
सदर गुन्हयाचे तपासात अर्धवट जळालेले प्रेत हे मोजे औरंगपुर ता. केज येथील विठठल माणीक धायगुडे वय 35 वर्षे याचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याची पत्नी नामे सुमेधा विठठल धायगुडे वय 32 वर्षे हिचे विठठल माणीक धायगुडे याचे आत्याचा मुलगा नामे रामदास किसन शितळकर वय 22 वर्षे यांचे सोबत मागील दोन वर्षा पासुन अनैतिक संबंध होते. त्यांचेतील अनैतिक सबंधाची माहिती मयत विठठल माणीक धायगुडे यास माहिती झाली होती, त्यामुळे तो त्याचे पत्नीस रामदास शितळकर सोबतचे संबंध तोडुन टाक असे म्हणत होता. तसेच पती पत्नीमध्ये त्या कारणावरुन सतत भांडणे होत होती. त्यामुळे विठठल धायगुडे हा सुमेधा व रामदास यांचेतील अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने त्या दोघांनी विठठल धायगुडे याचा कायमचा काटा काढण्याचा ठरविले.
असा घडला घटनाक्रम.....!
दि.02.04.2022 रोजी रात्री 22.00 वाजण्याचे सुमारास सुमेधा धायगुडे हिने तिचा पती विठठल धायगुडे यास घरात गर्मी होत असल्याने आपण घराचे शेजारीच असलेल्या तुकाराम पारेकर यांचे शेतात झोपण्यासाठी घेऊन गेली. 10.30 च्या सुमारास पती झोपल्याची खात्री झाल्यावर तिने पतीचे मोबाईल वरुन प्रियकर रामदास शितळकर यास शेतात बोलावून घेतले. रामदास शितळकर हा येतांनाच कुऱ्हाड घेऊन आला होता. विठठल धायगुडे हा झोपेत असतांना कुऱ्हाडीने त्याचे डोकीत वार करुन खुन केला. व त्यानंतर त्याचे प्रेत सुमेधा व रामदास यांनी सुग्रासचे गोणीत भरुन एका मोटार सायकलवर लाडेवडगाव शिवारात घेऊन जाऊन शेतातील कडब्या मध्ये जाळुन पुरावा नष्ट केला आहे. सदरचा गुन्हा तांत्रिक पुराव्याच्या अधारे उघडकीस आला असून दि.27.04.2022 रोजी औरंगपुर येथील एक व्यक्ती मागील तिन आठवडया पासुन बेपत्ता असल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यावरुन खात्री करता औरंगपुर येथील विठठल माणीक धायगुडे हा दि.02.04.2022 रोजी पासुन बेपत्ता असल्याचे खात्री झाली.
आरोपी सुमेधा विठठल धायगुडे व रामदास किसन शितळकर दोन्ही रा. औरंगपुर यांना दि.27.04.2022 रोजी ताब्यात घेऊन विचारपुस करता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांना दि.27.04.2022 रोजी सायंकाळी 06.22 वा अटक करण्यात आली आहे. आज रोजी त्यांना मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदरचा गुन्हयातील मयताची ओळख पटविणे हे मोठे आव्हान होते. परंतु सदरचा गुन्हा उघडकीस होण्यास मदत झाली. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी व आरोपी अटके साठी मा.प्रभारी पोलीस अधिक्षक, सुनिल लांजेवार, मा.कविता नेरकर, अपर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही स्वत: तसेच सपोनि/एस.व्ही.दहिफळे, पोलीस ठाणे युसुफ वडगाव तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केज येथील वाचक पोलीस उप निरीक्षक, एम.पी. कुलकर्णी, पोह/1307 संजय राठोड, पोह/1224 बालाजी दराडे, चापोह/सय्यद अमजद, पोना/1632 सचिन अहंकारे, पोना/1688 महादेव सातपुते, पोना/1384 विकास चोपने पोलीस ठाणे केज येथील सायबर तज्ञ पोना/1035 अनिल मंदे व सायबर सेल बीड येथील पोह/सय्यद सलीम, पोकॉ/विक्की सुरवसे व आमचे कार्यालयातील तसेच पोलीस ठाणे युसुफ वडगाव येथील इतर पोलीस अंमलदार यांनी दिवसरात्र परिश्रम घेऊन गुन्हा उघडकीस आणला अशी माहिती पंकज कुमावत (आपोस) सहा.पोलीस अधिक्षक, उप विभाग केज यांनी दिली.