किल्ले धारूर दि.22 एप्रिल – धारुर (Dharur) शहरातील बस डेपोसमोर एका पाच वर्षीय बालकाला ट्रॅक्टरने चिरडल्याची हृदयद्रावक (heartbreaking) घटना घडली आहे. या अपघातात बालकाचे जागिच निधन झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार शहरातील राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 548 सी या माजलगावकडे (Majalgoan) जाणाऱ्या रस्त्यावर बस डेपोच्या (Bus Depot) समोर आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारासा सदर अपघात झाला. शहरातील संभाजीनगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या एका पाच वर्षीय बालकाला ट्रॅक्टर (tractor) क्र. एम एच 44 डि 1908 या ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनाने चिरडले.
शिवराज लक्ष्मण सुरवसे (वय 5) असे मृत बालकाचे नाव आहे. बस डेपो जवळच आपल्या आज्जीसोबत सदर बालक आपल्या शेतात गेला होता. परत येत असताना ट्रॅक्टरच्या समोरील मोठ्या टायर खाली येवून बालक चिरडले गेले. ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उतरले. यावेळी जवळच्या नागरीकांनी अपघातस्थळी (Accident) धाव घेतली. परंतू बालकाचा जागीच मृत्यू झाला.
आज सकाळी घडलेल्या या अपघातामुळे संभाजीनगर भागात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती कळताच नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
( A heartbreaking incident took place in the morning vigil in Dharur city; The child was crushed by the tractor. )