माजलगाव दि.२० ( प्रतिनिधी ):- माजलगाव शहरातील नवनाथ नगर भागात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाले आहेत ही घटना आज दुपारी ४.४५ च्या सुमारास घडली .
शहरातील नवनाथ नगर भागातील शिवानंद मनोहर डहाळे यांच्या घरात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली बघता बघता या आगीने रुद्र रूप धारण केल्याने या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य कपडे अन्नधान्य सर्व जळून खाक झाले त्याच बरोबर लगत असलेल्या दिनकर विश्वनाथ जोगडे यांच्याही घराला आग लागल्यामुळे त्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य कपडे जळून खाक झाले आहेत ही रुद्ररूप धारण केलेली आग विजवण्यासाठी भागातील तरुणांनी नागरिकांनी महिलांनी त्याच बरोबर माजलगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने खूप मोठे प्रयत्न केले मात्र ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल दोन तास लागल्यामुळे या दोन्ही घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये जीवित हानी झाली नाही याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नव्हती डहाळे कुटुंबियांचा आज काही शिल्लक राहिल्याने राहिल्यामुळे या कुटुंबाला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.