बीड : बीड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तथा आ. संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. रेखा क्षीरसागर यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांना बुधवारी सायंकाळी अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रेखा क्षीरसागर अनेकवर्ष राजुरी गावच्या सरपंच होत्या तसेच त्या बीड जिल्हा परिषदेच्या सदस्य देखील होत्या. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.त्यांच्या पश्चात पती रवींद्र क्षीरसागर यांच्यासह आ. संदीप क्षीरसागर , हेमंत आणि अर्जुन ही मुले, सुना , नातवंडे असा परिवार क्षीरसागर कुटुंबियांच्या धक्क्यात 'प्रजापत्र ' परिवार सहभागी आहे.
प्रजापत्र | Wednesday, 20/04/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा