बीड-गोवंश तस्करी आणि कत्तल यावर बंदी असताना देखील ११ गायी आणि ८ वासरांची तस्करी करणाऱ्यास अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडले.यावेळी एका आरोपीला ताब्यात घेतले असून अन्य एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.१२ एचडी ०४२१ मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या आपल्या स्वतःची फायदा करिता नेकनूर येथून ११ गाई ८ वासरे टेम्पोमध्ये भरून कत्तल करण्यासाठी बीड येथे घेऊन जात आहे .त्यानंतर कुमावत यांनी सदर टेम्पो बीड नेकनुर ते बीड जाणारे रोडवर नेकनूर येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे २ वाजता टेम्पो थांबवून टेम्पो चालकास नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव शेख मज्जिद शेख राजा क रा मोमिनपुरा बीड असे सांगितले सदर टेम्पो ची पाहणी केली असता सदर टेम्पोमध्ये ११ गाई व ८ वासरे मिळून आले सदर टेम्पो चालकास गाईचे व वासरांचे दाखल याबाबत विचारपूस केली असता जवळ नसल्याचे सांगून सदरची जनावरे ही मोमीनपुरा बीड येथील व्यापारी सोहील जलील कुरेशी यांच्या असून त्यांच्या सांगण्यावरून नेकनूर येथून टेम्पोमध्ये भरून बीड येथे घेऊन जात आहे असे सांगितले. पोलिसांच्या कारवाईत दोन लाख रुपयांची जनावरे आणि चार लाख रुपयांचा टेम्पो असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.