बीड-पाच महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप न्यायालयाच्या मध्यस्थीने मिटला असून बीडमध्ये मागच्या ८ दिवसांपासून ५०० एसटी कर्मचारी कामावर परतल्याने बस सेवा जोमाने सुरु झाली आहे.रविवारपासून बीड जिल्ह्यातून रातराणी बस सेवा सुरु करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून बस पूर्ण क्षमतेने सुरु धावू लागल्यामुळे खाजगी वाहतूकदारांच्या मनमानीला मोठा चाप बसत आहे.
सध्या बीड जिल्ह्यातून दिवसाला बसच्या ७०० च्या घरात फेऱ्या होत असून ५० हजार प्रवाशी बस सेवेचा लाभ घेत आहेत.यामुळे महामंडळाचे उत्त्पन्न ४० लाखांच्या घरात गेले असून झपाट्याने कर्मचारी कामावर परतु लागल्याने लालपरीची सेवा पूर्ववत होऊ लागल्याचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी म्हटले आहे.आजपासून रातराणीही बस सुरु झाल्या असल्याने प्रवाशांना रात्री आराम करत प्रवास करता येणार असून बीड-मुंबई (सीटर स्लिपर) बससाठी ८४० रुपये तर बीड-पुणे बससाठी ५२० रुपये मोजावे लागणार आहेत.तर दुसरीकडे खाजगी वाहनांमधून सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करायचा झाल्यास १ हजार रुपये तर इतर वेळी ६०० रुपयांच्या घरात खर्च येतो.त्यामुळे प्रवाशांना बसमधून प्रवास करणे आर्थिक आणि शारीरिकदृष्टया परवडणारे असल्याचे चित्र आहे.
प्रजापत्र | Sunday, 17/04/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा