Advertisement

शुक्रवारी तब्बल 48 हजार प्रवाश्यांनी घेतला एसटीचा लाभ

प्रजापत्र | Friday, 15/04/2022
बातमी शेअर करा

बीड दि.15 (प्रतिनिधी) : जिल्ह्यात बस फेर्‍यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून शुक्रवारी तब्बल बीड जिल्ह्यातून 718 बस फेर्‍यांची नोंद झाली. यावेळी 47 हजार 931 प्रवाश्यांनी एसटीचा लाभ घेतला असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी दिली. यावेळी आणखी 69 कर्मचारीही कामावर परतले असल्याचे श्री मोरे यांनी म्हटले आहे. 

 

सध्या एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटला असून बीड जिल्ह्यात कामावर परतणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या अलीकडच्या काळात वाढू लागली आहे. 8 ते 15 एप्रिलमध्ये 173 चालक, 174 वाहक, यांत्रिकी विभागातील 67 तसेच प्रशासकीय विभागातील दोघे अशा 416 जणांनी कामावर येण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी पुन्हा 69 कर्मचारी कामावर परतल्याने जिल्ह्यातील बससेवा आणखी ताकदीने सुरळीत होणार आहे. दरम्यान शुक्रवारी 718 फेर्‍यांचा विक्रम झाला असून यावेळी 47 हजार 931 प्रवाश्यांनी बससेवेचा लाभ घेतला. यावेळी बीड जिल्ह्यातून 6 शिवशाही बसही धावल्या असल्याचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी सांगितले आहे.

Advertisement

Advertisement